Mumbai Local Traine: गर्दी, घाम आणि मरणाचा उकाडा सहन करत मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पर्याय उपलब्ध झाला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. अर्थात हा प्रवास काहीसा महाग होता. पण आता त्यातही तिकीट दरात कपात करण्यात आल्याने मुंबईकरांनी भरभरुन प्रतिदास द्यायला सुरुवात केली आहे. होय, आम्ही बोलत आहोत एसी लोकल संदर्भात. जेव्हापासून एसी लोकल तिकीट (Ac Local Ticket) दर कमी झाले आहेत तेव्हापासून मुंबईकरांनी एसी लोकलचा गारेगार प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तिकीट दरात कपात केल्याने प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एसी लोकल आणि सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी तिकीट दरात मोठ्या प्रमाणावर कपात केली. त्यामुळे कपात केलेले दर लागू झाल्यावर पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेवर तिकीट विक्रीमध्ये वाढ होऊन ती एका झटक्यात एकूण 9,651 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे वाढत्या तिकीट दरासोबत सुरु झालेल्या आणि रिकाम्या धावणाऱ्या एसी लोकल आता प्रवाशांनी भरुन धावताना दिसत आहेत. (हेही वाचा, मुंबईकरांचा 'फर्स्ट क्लास लोकल' प्रवास आता कमी पैशात, तिकीट दरात 50% कपात)
आरामदाई प्रवासासाठी लोकल आणि वाहतुकीत सुधारणा व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून मोठ्याच प्रमाणावर होती. त्यामुळे आता अशा प्रकारे आरामदायी प्रवास सुरु झाल्याने प्रवाशांमधून आनंद व्यक्त होतो आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईसारख्या दमट वातावरणाच्या शहरात प्रवासी एक तासाहून अधिक काळ सलग प्रवास करत असतात. अशा वेळी रस्त्यांवरील खड्डे, गतिरोधक आणि वाहतूक कोंडी यांमुळे प्रवासी हैराण होतात. अशा वेळी एसी लोकल अधिक फायद्याच्या ठरत आहेत.