प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रात 5 हजाहर 797 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 2 हजार 601 आरोपींना अटक तर, 15 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहेत. राज्यात लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, राज्यात लॉकडाउन असताना अवैध पद्धतीने मद्य विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील 5 हजार 569 मद्यविक्रीच्या दुकानांना राज्य सरकारकडून परवानगी दिली आहे. दिवसभरात 32 हजार 700 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा पुरवली जात आहे. तसेच अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी 5 हजार 797 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात 2 हजार 601 आरोपींना अटक तर, 15 कोटी 56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. हे देखील वाचा-Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत 2100 नव्या रुग्णांची वाढ; आज दिवसभरात 1,202 रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

ट्वीट-

महाराष्ट्रात केवळ ग्रीन झोनमध्ये असलेल्या दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मद्य विक्रीच्या दुकांनाना परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, दारुच्या दुकांनासमोर मद्यपींची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर पुन्हा राज्यात दारु बंदी करण्यात आली. त्यानंतर आता ग्रीन झोनमध्ये ऑनलाईन पद्धतीने दारुची विक्री केली जात आहे.