
देशभरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना ऐकायला मिळत आहे. यातच मुंबईतील मालाड (Malad) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 55 वर्षीय प्रियकराने 58 वर्षीय प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला आहे. इतकेच नव्हे प्रेयसीवर घरात घुसून चाकूने सपासप वार केल्यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मालाड पूर्वच्या कुरार गावातील पुष्पा पार्क मध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मालाडच्या पुष्पा पार्कमध्ये 58 वर्षीय महिला आपल्या वृद्ध आई, 2 मुली आणि 1 मुलासह राहत होती. या महिलेचे 55 वर्षीय सचिन चौहानवर प्रेम होते. ते गेल्या 15 वर्षांपासून सोबत होते. त्यामुळे तो आपल्या प्रेयसीला भेटण्यास तिच्या घरी येत होता.हेदेखील वाचा- Jaisalmer: धक्कादायक! विधवा महिलेचा पुनर्विवाहास नकार; संतापलेल्या सासरच्या मंडळींनी कापले नाक व जीभ
15 नोव्हेंबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास प्रेयसीच्या घरी भेटायला आला. तेव्हा त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर माथेफिरू प्रियकराने सोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केले. जेव्हा प्रेयसी आपला बचाव करु लागली, तेव्हा या निर्दयी प्रियकराने तिच्या चेहऱ्यावरही वार केले. जेव्हा प्रेयसी जखमी होवून पडली तेव्हा त्याने सुतळी बॉम्ब जाळला आणि आपल्या तोंडात टाकून स्वत:ला उडवून घेतलं. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सचिन चौहान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मालाड पूर्व कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात, एका विधवा महिलेने पुन्हा लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे नाक आणि जीभ कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.