Covid-19 Cases In Maharashtra: राज्यात गेल्या 24 तासांत 50 नवीन कोरोना रुग्णांची नोंद; 9 जणांना JN.1 व्हेरिएंटचा संसर्ग
प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

Covid-19 Cases In Maharashtra: देशभरात कोरोना (Covid-19) पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या दैनिक बुलेटिननुसार, महाराष्ट्रात रविवारी 50 नवीन कोविड प्रकरणे (Covid-19 Cases) नोंदवली गेली. सुमारे तीन वर्षांपूर्वी कोरोनाव्हायरसच्या प्रसाराच्या सुरुवातीपासून एकूण संक्रमणांची संख्या 81,72,135 झाली आहे. ताज्या प्रकरणांपैकी, नऊ रुग्णांना नवीन JN.1 व्हेरिएंटची लागण झाली. ज्यामुळे राज्यातील नवीन उप-प्रकाराशी संबंधित संसर्गाची संख्या 10 झाली आहे. JN.1 रुग्णांमध्ये ठाणे शहरातील पाच, पुणे शहरातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येकी एक, अकोला शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. पुण्यातील एक रुग्ण अमेरिकेला गेला होता, असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

सर्व JN.1 बाधित रुग्णांची प्रकृती बरी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन स्ट्रेनला त्याचा वेगाने वाढणारा प्रसार लक्षात घेऊन एक वेगळा Variant of Interest म्हणून वर्गीकृत केले आहे. परंतु, या व्हेरिएंटमुळे जागतिक सार्वजनिक आरोग्य कमी धोक्यात असल्याचेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे. (हेही वाचा - Corona JN.1 Variant Cases: कोरोनाच्या प्रकारामुळे अनेक राज्यांमध्ये वाढली चिंता; केंद्र सरकारने दिल्या सूचना, म्हणाले, 'घाबरण्याची गरज नाही')

JN.1 चे उप-प्रकार देशात आढळले असले तरी, त्वरीत चिंतेचे कारण नाही. कारण संक्रमितांपैकी 92 टक्के लोक घरगुती उपचार निवडत आहेत, जे सौम्य आजाराचे संकेत देतात, असं एका आरोग्य अधिकाऱ्याने म्हटलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ज्यांना सर्दी, खोकला किंवा ताप आहे त्यांनी इतर लोकांपासून अंतर राखावे, मास्क वापरावे आणि हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावेत. (हेही वाचा - JN.1 Covid Case in Maharashtra: कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज; CM Eknath Shinde यांचे प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन)

महाराष्ट्रात आतापर्यंत कोविडसाठी 8,75,65,093 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 81,72,135 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत 80,23,418 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात 656 कोविड संसर्गाची वाढ झाली आहे तर सक्रिय प्रकरणे 3,742 वर पोहोचली आहेत.