हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतर आता असे गुन्हे करणा-यांना कठोर शासन होईल असे वाटत होते. यामुळे असे कृत्य करणा-यांच्या मनात भीती निर्माण होईल आणि असे गुन्हा करण्यास ते धजावणार नाही असे वाटत होते. मात्र अशा घटना कमी व्हायचे सोडून त्या आणखी गंभीर रुप धारण करत आहेत. त्यात भिवंडीत (Bhiwandi) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन भावाने आपल्या 5 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईजवळच्या भिवंडी परिसरात पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी अल्पवयीन चुलतभावाला केवळ दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली. महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगार न्यायमंडळाने आरोपीला दहा हजारांचा दंड आणि समाजसेवा करण्याचे आदेश दिले आहेत.
हेदेखील वाचा- धक्कादायक! हिंगोलीत गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचाराला कंटाळून घेतला गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 28 ऑक्टोबरला भिवंडीतील सारवली गावातील कोनगाव भागात राहणारी ही पाच वर्षांची चिमुरडी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना दुसर्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह त्यांना पाण्याच्या पाईपलाईनजवळ सापडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त फटाके नेण्याच्या बहाण्याने आरोपी भाऊ पीडित मुलीला निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याने चिमुकलीची हत्या केली होती. मुख्य म्हणजे ही घटना भाऊबीजेच्या दुस-याच दिवशी घडल्या कारणाने या घृणास्पद प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी 13 वर्षाच्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून न्यायालयाने याला 10 हजार रुपये दंड म्हणून भरण्यास सांगितले आहे. तसेच त्याला फक्त दंड लावून सोडलं जाऊ शकत नाही. किशोरवयीन आरोपीला समाजाप्रती आपलं दायित्व लक्षात येण्यासाठी समाजसेवाही करावी लागेल, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.