Mobile Blast (PC - File Photo)

Jalna Shocker: जालन्यात मोबाईलच्या स्फोटामुळे एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारच्या (४ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली. मोबाईल चार्जिंगला लावून फोनवर बोलत असताना दुर्घटना घडली. अल्पवयीन मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो दरम्यान अश्या गोष्टी घडत आहे. हेही वाचा- भंडारा जिल्ह्यात मोबाईल स्फोट झाल्याने 12 वर्षीय मुलगा जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील सिल्लोड आमठाणा येथे ही घटना घडली. समर्थ तायडे वय (5) असं मृत मुलाचे नाव आहे. जालाना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम झाल्यानंतर समर्थ कुटुंबासोबत राहत्या घरी परतला. मात्र, फोन चार्जिंगला लावून कोणाशी तरी बोलत होता. दरम्यान बॅटरी फुगली आणि स्फोट झाला. समर्थच्या कानाला आणि बोंटाना गंभीर जखम झाली.

त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकिय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे समर्थच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. फोनच्या स्फोटामुळे अनेक दुर्घटना घडत असतात.