मुंबई: धारावी परिसरात 5 नव्या COVID-19 बाधितांसह या परिसरातील रुग्णांची एकूण संख्या 22 वर
Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मुंबई महानगरपालिकेने शहरातील तब्बल 381 ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यातील धारावी परिसरात झपाट्याने कोरोनाचा फैलाव होत असल्या कारणाने येथील रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. धारावीत 5 नवे रुग्ण सापडले असून या परिसरात एकूण 22 रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती मुंबईसाठी खूपच चिंताजनक असल्याचे मुंबई महापालिकेने सांगण्यात येत आहे.

मुंबई शहरामध्ये वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता मुंबई महानगर पालिकेने धारावीतील भाजी विक्रेते, फळ विक्रेते सह फेरीवाल्यांना धारावीतील कंटेनमेंट झोन (Containment Area), बफर झोन (Buffer Zone)मध्ये आता व्यवसाय करण्यावर बंदी घातली आहे.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई शहरातील 381 ठिकाणं BMC कडून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित; पहा संपूर्ण यादी

दरम्यान धारावीतील कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील धारावी हा अतिशय दाटीवाटीचा भाग आहे. या भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. दरम्यान त्याचा अधिक फैलाव होऊ नये. यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहे.

भारतात 547 नव्या रुग्णांसह आज कोरोना बाधितांची एकूण संख्या 6412 इतकी झाली आहे. यात गेल्या 12 तासांमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असल्याचे आरोग्य मंत्रलायाकडून सांगण्यात येत आहे. भारतातील 6412 रुग्णांपैकी 5706 रुग्णांवर उपचार सुरु असून 504 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.