Nandurbar Accident: नंदुरबार अपघातात मरण पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
CM Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मंजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या अपघातात मरण पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर केले आहे. ही घटना धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील तोरणमाळ घाटातील (Toranmal Ghat) खडकी पॉईंटजवळ आज (23 जानेवारी) सकाळी घडली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन 6 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात 5 महिलांचा समावेश आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मरण पावलेले मजूर हे आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील आहेत. याशिवाय या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू असून ते देखील शासनाच्या खर्चानेच करण्यात येतील असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Accident: लग्नासाठी जात असताना रस्त्यातच गाडीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू, 6 जण जखमी

ट्वीट-

दरम्यान, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (23 जानेवारी) भीषण अपघात घडल्याची घटना उघसकीस आली आहे. या अपघात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अन्य 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.