Pure Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Amravati: अमरावतीच्या युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) च्या राजापेठ शाखेत (Rajapet Brach) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या ऑडिटनुसार बँकेत तारण ठेवलेल्या तब्बल 59 ग्राहकांचे 5 किलो 800 ग्रॅम सोने बनावट असल्याची बाब समोर आलं आहे. यासंदर्भात राजापेठ पोलिसांनी माहिती दिली आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बँकेत तारण ठेवलेल्या 92 ग्राहकांपैकी 59 ग्राहकांचे 5 किलो 800 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये छेडछाड केल्याचं मान्य केलं आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरावतीतील युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत 59 लॉकर्समध्ये सुमारे 3.5 कोटी रुपयांच्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता बनावट सोन्याचे दागिने सापडले आहेत. हा सर्व प्रकार खरा असल्याचं बँक व्यवस्थापनाने मान्य केलं आहे. (हेही वाचा - Debt Recovery Rule: कर्ज वसुली एजंटबाबत आरबीआयचे सक्त नियम; सकाळी 8 पूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर ग्राहकांना करु नयेत फोन, घ्या जाणून)

दरम्यान, युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी बनावट सोन्याचे दागिने कोठून आले? या सर्व प्रकरणात बँकेचे कोणते अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत? यासंदर्भात बँक प्रशासन चौकशी करणार आहे. या सर्व प्रकारामुळे युनियन बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविला आहे. या प्रकरणाचा तपास लागल्यानंतरचं बनावट सोन्यासंदर्भातील खुलासा होणार आहे. या सर्वात बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.