Monsoon 2019 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Monsoon Updates In Mumbai: मुंबई  सह उपनगरात आज, रविवार 5 जुलै ला सुद्धा सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 36 तासांत, कोकणात बहूतांश ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असे समजत आहे. येत्या 12 तासात मुंबई आणि ठाणे येथील पावसाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी पाऊस मुसळधार स्वरूपातीलच असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई व ठाणे येथे रेड अलर्ट (Red Alert)सुद्धा जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर (Palghar) जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. Mumbai High Tide 4th July 2020: मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात उसळल्या उंच लाटा, मुंबईत पावसाचा जोर वाढला (Watch Video)

शनिवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून दक्षिण मुंबईतील कुलाबा हवामान केंद्रामध्ये 12 तासात 74.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ हवामान केंद्रात 132.2 मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

मुंबईतील पावसाचे व्हिडीओ

दरम्यान, मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी व कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी उपाययोजना यासंदर्भात काल उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती यावेळी त्यांनी कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे अशा सूचना केल्या आहेत.