Image For Representation (Photo Credits: ANi)

Mumbai High Tide: मुंबईत आज, 4  जुलै 2020 रोजी समुद्रात सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी उंचच उंच लाटा उसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या हायटाईडचे (High Tide) दृश्य ANI या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळी वाऱ्याच्या वेगाचा आणि समुद्री लाटांचा अंदाज लावल्यास सुमारे 15 मीटर उंच लाटा समुद्रात उसळतील असे अंदाज आहेत. याकाळात मुंंबईकरांनी समुद्र किनाऱ्यापाशी जाऊ नये असे आवाहन बीएमसी (BMC) तर्फे अगोदरच करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईत पावसाचा जोर सुद्धा वाढत आहे. मुंबई सोबतच उपनगरात व ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी भागात सुद्धा पाऊस वाढत आहे. येत्या 48 तासात हा पावसाचा वेग कायम राहणार असल्याचेही हवामान खात्याने म्हंटले आहे.

ANI ने आज सकाळी 11 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात उसळलेल्या उंच लाटा दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हाय टाइडचा संभाव्य वेळ हा 11 वाजून 40 मिनिटे होता त्यानुसार पुढील काही वेळासाठी या लाटा कायम असतील आणि यावेळेत 15 मीटर उंचीच्या लाटा सुद्धा पाहायला मिळतील असाही अंदाज आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कालच्या दिवसभरात मुंबईत तब्बल 156 मिमी पावसाची मुंबईत नोंद झाली होती. आज हवामान खात्याने मुंबईसोबतच पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigad) नाशिक (Nashik) या जिल्ह्यांला रेड अलर्ट दिला आहे.