High tide at Marine Drive in Mumbai. (Photo Credits: IANS/File)

Mumbai Rains & High Tide Update: मुंबई मध्ये काल दिवसभरात झालेल्या पावसांनंतर आज सुद्धा अनेक भागांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबई सह उपनगरात पावसाचा जोर वाढणार आहे. याशिवाय आज सकाळी 11.40 वाजता 4.57 मीटर एवढी हायटाईड (High Tide) सुद्धा होणार आहे. यावेळी वाऱ्याच्या वेगाचा आणि समुद्री लाटांचा अंदाज लावल्यास सुमारे 15 मीटर उंच लाटा समुद्रात उलटली असे अंदाज आहेत. याकाळात मुंंबईकरांनी समुद्र किनाऱ्यापाशी जाऊ नये असे आवाहन बीएमसी (BMC)  तर्फे अगोदरच करण्यात आले आहे. काल दिवसभरात तब्बल 156 मिमी पावसाची मुंबईत नोंद झाली होती. आज हवामान खात्याने मुंबईसोबतच पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigad) नाशिक (Nashik) या जिल्ह्यांला रेड अलर्ट दिला आहे.

मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, कोकण, तळकोकण भागात कालच्या दिवसभरात पाऊस चांगलाच जोर धरून कोसळत होता. पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत. मुंबईतील अरबी समुद्राच्या वर ढगाळ वातावरण असल्याने काही भागात आज कालच्या पेक्षाही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे.

ANI ट्विट

BMC ट्विट

कालच्या पावसात मुंबईत अनेक ठिकाणि पाणी साचण्याची प्रकार सुद्धा समोर आले होते यात दादरच्या हिंदमाता (Hindmata) परिसरात वॉटर लॉगिंग पाहायला मिळाले होते. मुंबईतील नळ बाजार मधील गोल देऊळ येथे अतिमुसळधार पावसामुळे वॉटर लॉगिंग झाले होते.