कोंबडीचे यकृत खरेदी करण्याऐवजी चॉकलेटवर 10 रुपये खर्च केल्याने एका 40 वर्षीय महिलेला तिच्या 6 वर्षाच्या भाचीच्या खासगी भागावर गरम चमच्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेने पीडित मुलीच्या तोंडात टॉवले भरवून मुलीचे हात बांधले आणि तिच्या खासगी भागावर अनेकदा गरम चमच्याने चटके दिले, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
या चिमुरडीवर केईई रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या मुलगीची प्रकृती सुधारत आहे. पीडित मुलीच्या आईचे निधन झाले असून तिच्या मद्यपी वडिलांनी तिचा त्याग केला होता. त्यामुळे पीडित मुलगी तिच्या मावशीकडे राहत होती. शनिवारी आरोपीच्या मेहूण्याने चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली, अशी माहिती मालवणीचे पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिली. (हेही वाचा - Husband Kills Wife: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने मृतदेह पुरला शेतात; बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील घटना)
या सर्व प्रकारानंतर आरोपी महिलेवर खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी धमकी यासाठी भारतीय दंड संहिता तसेच पोस्को कायदा व बाल कामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज या आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी आरोपी महिलेने मुलीला चिकन खरेदीसाठी 50 रुपये घेऊन बाजारात पाठवले होते. यावेळी पीडित मुलीने शिल्लक पैशांचे कोंबडीचे यकृत खरेदी करण्याऐवजी चॉकलेट खरेदी केले. त्यामुळे आरोपी महिलेने पीडित मुलीचे हात बांधले आणि तिला गरम चमच्याचे चटके दिले.
आरोपीच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यानुसार, 'आरोपी महिला माझ्या भाचीकडून घरातील सर्व कामं करून घेत असे आणि छोट्या-छोट्या चुकांवरून मारहाण करत असे. शनिवारी, मी मुलीला पाहण्यासाठी आलो असता पीडितेला वेदना होत होत्या. मुलीला खूपवेळा विचारल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने आपल्या खाजगी जागेवरील जखमा दाखवल्या. तिच्या मावशीने तिला मारहाण केल्यानंतर याविषयी कुणाला सांगितले तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली होती. या सर्व प्रकारानंतर आरोपीच्या मेहुण्याने पीडितेला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सध्या पीडित मुलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.