कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे देशातील लॉकडाऊन (Lockdown 4.0) 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे रोजंदारीवर जगणा-या स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे. आपल्या घरी आपल्या कुटूंबाकडे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मजूर मिळेल त्या वाहनाने इतकंच काय तर पायी प्रवास करत आहे. अशाच मजूरांना सोलापूर हून झारखंड ला घेऊन जाणा-या बसचा यवतमाळ (Yavatmal) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस मागून ट्रकला धडकून पुढे असलेल्या ट्रकमध्ये घुसली. या धडकेत बसच्या पुढील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून तो ट्रकमध्ये घुसला. या अपघातात बसमधील 4 मजूर ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात आज पहाटे 4.30 च्या सुमारास झाला. ही एसटी बस स्थलांतरित मजूरांना सोलापूरहून झारखंड ला घेऊन चालली होती. या एसटी बसने उभ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत 4 मजूर जागीच ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात 22 ते 25 मजूर प्रवास करत होते. जखमींना तातडीने जवळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra: 4 migrant workers killed, 15 injured after a bus they were travelling in crashed into a truck, in Yavatmal, early morning today. The bus was travelling from Solapur to Jharkhand. pic.twitter.com/kEURdmqTOx
— ANI (@ANI) May 19, 2020
हा अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग चक्काचूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये (UP) एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ट्रकमधून आपल्या घरी निघालेल्या मजूरांवर रस्त्यातच काळाने घाला घातला. दोन ट्रकच्या भीषण अपघातात मिहौली राष्ट्रीय महामार्गावरून जाणा-या 23 मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर 15 हून अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.