Earthquake | (Photo Credits: Pixabay)

सोलापूर (Solapur) आणि पूर्व उत्तर कोल्हापुरात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. सोलापुरातील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याची माहिती आहे. कर्नाटकातील विजयपूरजवळ सोलापूर जिल्ह्यातील भूकंपाचा केंद्रबिंदू आढळून आला आहे. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप सकाळी 6.30 च्या सुमारास झाल्याची माहिती आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणत्या भागात आणि किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के स्थानिकांना जाणवले.  सुरुवातीला लोकांच्या घरातील वस्तू हलू लागल्यावर त्यांना लगेच काहीच समजले नाही. पण लवकरच लोकांना भूकंप झाल्याचे समजले. सोलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कर्नाटकातील विजयपूरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आढळून आला आहे. येथील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजण्यात आली. हेही वाचा SSC, HSC Supplementary Hall Ticket: HSC SSC पुरवणी परीक्षेचे आजपासून मिळणार हॉल तिकीट, 'असे' करता येईल डाऊनलोड

दरम्यान, जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात किती नुकसान झाले आहे, याचा शोध घेण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र पावसामुळे जिल्ह्यात अद्याप कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. आता स्थानिक प्रशासन सकाळी भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे.