महाराष्ट्र: कराड जवळ दोन वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी ; 31 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jan 31, 2021 11:54 PM IST
आज 31 जानेवारी. महिन्याचा शेवटचा रविवार. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या आपल्या रेडिओ प्रोग्रॅममधून देशवासियांशी संवाद साधतात. नववर्षातील मन की बात चा हा पहिलाच कार्यक्रम असून आज सकाळी 11 वाजता रेडिओ, युट्युब आणि अन्य माध्यमातून प्रोग्रॅम तुम्हाला ऐकता येईल.
उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प 2021 सादर करणार आहेत. कोरोना व्हायरस संकट, त्यामुळे डळमळीत झालेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, शेतकरी आंदोलन या सर्व प्रश्नांवर उद्या बजेट अंतर्गत काय मोठी घोषणा होणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, उद्यापासूनच सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल खुली होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोविड-19 चा धोका अद्याप टळलेला नसल्याने सर्वसामान्य नागरिक ठराविक वेळेतच लोकल प्रवास करु शकतात. त्यासाठी त्यांना मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.