Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. मात्र, काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. तसेच फेसबूक (Facebook), व्हॉट्सऍप (Whatsapps) आणि ट्वीटरच्या (Twitter) माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने (Maharashtra Cyber Department) कठोर पाऊले उचलली जात आहेत. सोशल मीडिया वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यात आतापर्यंत 301 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे. बीड आणि पुणे ग्रामीण भागानंतर सर्वाधिक गुन्हे मुंबईमध्ये नोंदवण्यात आले आहेत.

या सर्व गुन्ह्यांचे जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 124 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 112 गुन्हे दाखल करण्यात आले. टिक-टॉक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 9 गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियावर चुकीची पोस्ट केल्याप्रकरणी 48 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 100 आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 38 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे. हे देखील वाचा- इंडोनेशियाचे नागरिक असलेल्या 10 तबलिगींना मुंबईत अटक

मिळालेल्या माहितीनुसार, बीड-28, पुणे ग्रामीण-24 , मुंबई-20, कोल्हापूर-16, जळगाव-14, सांगली 12, नाशिक शहर-11, जालना-11, नाशिक ग्रामीण-10, बुलढाणा-10, लातूर-9, सातारा-9, नांदेड-9, ठाणे शहर-8, परभणी-7, सिंधुदुर्ग-7, नवी मुंबई-7, ठाणे ग्रामीण-6, हिंगोली-6, नागपूर शहर-6, पालघर-6, गोंदिया-5, सोलापूर ग्रामीण-5, अमरावती-4, पुणे शहर-4, रत्नागिरी-4, सोलापूर शहर-4, भंडारा-3, चंद्रपूर-3, रायगड-2, धुळे-2, वाशिम-2, पिंपरी- चिंचवड-1, औरंगाबाद-1 (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कोणत्याही नागरिकांनी सोशल मीडियाच्य माध्यामातून चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.