Coronavirus Update: महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या (Maharashtra Health Ministry0 माहितीनुसार पुणे विभागात (COVID 19 Cases In Pune) राज्यातील सर्वाधिक एकुण व अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असल्याचे समजत आहे. संंपुर्ण पुणे जिल्ह्यात 1 लाख 73 हजार 174 इतके कोरोना रुग्ण आजवर आढळले आहेत. यापैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांंची संंख्या 1 लाख 17 हजार 205 इतकी आहे तर आजवर 4060 जणांंचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तसेच पुणे विभागात कोरोनाचे 51,909 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे मुंबई (Coronavirus In Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,237 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,44,626 वर पोहोचली आहे.
केवळ पुणे शहराची आकडेवारी पाहिल्यास, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज 1658 नव्या रुग्णांंची नोंंद झाली असुन एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 94, 497 इतकी झाली आहे. यापैकी 76,686 जणांंनी आजवर कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात 15 हजार 544 अॅक्टिव्ह रुग्ण असुन यातील 833 रुग्ण गंभीर असून यातील 507 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 326 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
ANI ट्विट
Maharashtra reports 16,408 new COVID-19 cases, 7,690 discharges and 296 deaths, taking active cases to 1,93,548 (highest 51,909 cases in Pune), recoveries to 5,62,401 and death toll to 24,399: State Health Department pic.twitter.com/YWq8Eqfw56
— ANI (@ANI) August 30, 2020
मुरलीधर मोहोळ ट्विट
पुणे कोरोना अपडेट : रविवार, ३० ऑगस्ट,२०२०
शहरात नव्याने १,६५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ९४,४९७ झाली आहे. तर १,५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १५,५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ४,४५,७५९ झाली असून आज ५,७१३ टेस्ट घेण्यात आल्या. pic.twitter.com/jvT79d1gR3
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 30, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा हा सध्या 8 लाखाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. राज्यात आज कोरोनाचेआणखी 16,408 रुग्ण आढळून आले असुन एकुण रुग्णांंची संंख्या 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली आहे.