Nandurbar News: मुंबई पोलिसांनी सासऱ्यांची हत्या केल्या प्रकरणी चार जणांना अटक केले आहे. त्यापैकी दोन आरोपी अल्पवयनी असल्याचे समोर येत आहे. राजेंद्र उत्तमराव मराठे (53) यांची हत्या करण्यात आली आहे. नीलेश बच्चू पाटील (25), लकी किशोर बिरारे (19) आणि कायदेशीर कारणास्तव नाव सांगता येणार नाही अशा दोन अल्पवयीन मुलांनी राजेंंद्र यांची हत्या केली. (हेही वाचा- दारूच्या नशेत मित्राने दुचाकी डिव्हायडरवर घातली)
मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च राजेंद्र हे बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवला गेला. त्यानंतर 16 मार्च रोजी त्यांचा जळलेला मृतदेह आढळून आला. राजेंद्र हे जावई सोबत नंदूरबाद येथे राहायचे. जळलेला मृतदेह हा राजेंद्र यांचा असल्याचे पुष्टी झाली. त्यांचा मुली या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींला शोधण्यासाठी गुप्त माहितीचा आधार घेतला.
आरोपी घटनास्थळावरून मुंबईला फरार असल्याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने धक्कादायक माहिती सांगितली. आरोपीने सांगितले की, खून करण्यासाठी सुपारी मिळाली होती. राजेंद्र यांचा जावाई गोविंग सुरेश सोनार याने आरोपींना हत्येसाठी ३ लाख रुपये दिले होते. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सोनार याने संशयितांना हत्येसाठी तीन लाख रुपये दिल्याचे पोलिसांना आढळून आले. याशिवाय, एका संशयिताच्या मोबाईल फोनवर गुन्ह्याची आणि पुराव्याची विल्हेवाट लावणारी व्हिडिओ क्लिप सापडली आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून मोबाईल फोन आणि रोख 45,330 रुपये जप्त केले.