SBI | Twitter

Mumbai News: मुंबईतील भांडूप बॅंकेच्या लॉकरमधून 3 कोटी किमतीचे 4 किलो सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी सर्व्हिस मॅनेजर पदावर असलेल्या व्यक्तीला  अटक करण्यात आले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे बॅंक व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. 1.94 कोटी रुपयांचे सोन्याचे कर्ज दिल्यानंतर हे दागिने बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा-  स्वत:च्या आईच्या घरी चोरी, सोन्याचे दागिने चोरले

मिळालेल्या माहितीनुसार,SBI च्या मुलुंड शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या अमित कुमार यांनी 28 फेब्रुवारी रोजी भांडूप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आला होता. मनोज मारूती म्हस्के असं आरोपी मॅनेजरचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर, लॉकर फक्त दोन चावींनी उघडते.  लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे संशय आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

म्हस्के रजेवर असताना 27 फेब्रुवारीला हे प्रकरणी पहिल्यांदा उघडकीस आले आणि शाखेतून सोन्याच्या लॉकरची ड्युटी बजावणारे कुमार यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. 59 सोन्याचे पॅकेट गायब असल्याने बॅंकेत बोंबाबोंब झाली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मॅनेजरचे नाव पुढे आले. पोलिसांनी म्हस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हस्के यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 409 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करून त्यांच्याकडून सोनं जप्त करण्यात येत आहे.