महाराष्ट्र विधानसभा निवडणुक (Maharashtra Assembly Election 2019) आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून आज (ऑक्टोबर 7) उेमदवारी अर्ज (Nomination Form) मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अशावेळी अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
माघार घेण्याच्या या अंतिम मुदतीचा सर्वात जास्त फायदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज भरणाऱ्या 3 जणांनी आज माघार घेतली आहे.
आदित्य ठाकरे यांनी 3 ऑक्टोबर रोजी वरळी विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आणि आज त्यांच्या विरुद्ध अमोल निकाळजे, अंकुश कुर्हाडे आणि सचिन खरात या 3 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.
परंतु आदित्य ठाकरे यांची सध्या चर्चेत असलेली खरी लढत आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी 2 फेम अभिजित बिचुकले यांच्याशी. अभिजित बिचुकले यांनी 4 ऑक्टोबर रोजी वरळी मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.