मुंबई मध्ये बीकेसी पोलिसांनी (BKC Police) 16 मे दिवशी एका 29 वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. त्याच्यावर 30 वर्षीय महिलेवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप आहेत. मोहम्मद शेख (Mohammed Shaikh) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा मान्य केला आहे. पीडीतेकडून खोट्या बलात्काराच्या आरोपांमुळे तसेच 12 हजार पगाराने तो वैतागल्याने हे कृत्य केले.
सुरूवातीला पोलिसांना हे कृत्य रेप आणि मर्डर केसचं वाटत होते. यामध्ये महिलेच्या अंगावर अर्धेच कपडे असल्याने पोलिसांना ही बलात्काराची केस वाटत होती. पण नंतर पोलिसांनी कळालं की ते कपडे शेखने महिलेकडे पगाराची रक्कम लपवली आहे का? हे तपासण्यासाठी उतरवले होते. शेखने त्या महिलेसोबत बीकेसी परिसरातच पार्टी केल्यानंतर तिचा गळा कापला आणि मृतदेह नाल्यामध्ये फेकला. (नक्की वाचा: Nagpur: नागपूर येथील एका अल्पवयीन नातीने स्वतःच्याच आजीचा चिरला गळा, हत्येमागील कारण ऐकून पोलीसही चक्रावले).
शेखने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे च्या रात्री 10 वाजता पीडीतेने मोहम्मद शेखला फोन करून पार्टी साठी येण्यास सूचवलं. काही दारूचे ग्लास रिचवल्यानंतर ती पीडित महिला त्याच्यावर जबरदस्ती करू लागली पण त्याने थेट सुरा काढत तिचा गळा चिरला. ती शेखकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी विनवण्या करू लागली पण त्याने पैसे परत करण्याची मागणी रेटून धरली. रागाच्या भरात त्याने वारंवार हल्ले करत तिचा खून केला. नंतर रक्ताने माखलेला शर्ट आणि चाकू त्याने नाल्याच्या पलिकडच्या बाजूला जाऊन लपवला आणि मुंब्राला पळ काढला.
बीकेसी पोलिसांनी 96 तास सलग या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि शेखच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी कोविड ची पर्वा न करता नाल्यात देखील उतरण्याचा निर्णय घेतला. अखेरीस ते या प्रकरणाचा छ्डा लावण्यात यशस्वी ठरले आणि अखेरीस त्यांनी मोहम्मद शेखला कुर्ला येथून अटक केली. तो मुंब्राहून त्याच्या कुर्लाच्या घरी परतला होता. सध्या मोहम्मद शेखला 21 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.