Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

हृद्याचा ठोका चुकविणारी एक धक्कादायक घटना मुंबईतील कांदिवली (Kandivali) परिसरात घडली आहे. कांदिवलीच्या रस्त्यावरुन जाणा-या एका 28 वर्षीय बाइकस्वाराचा (Bike Riders) बेरिकेट्स अंगावर पडल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कैद झाली असून अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही की अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत (Accident) बाइकस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्यांवर असलेले मेट्रो रेलचे धातूचे बॅरिकेट्स या रस्त्यावरुन प्रवास करणा-या या बाईकस्वाराच्या अंगावर आदळले.  ज्यामुळे तो बाइकवरुन खाली पडला आणि बाजूने जाणा-या ट्रकखाली चिरडला गेला. हा अपघात इतका दुर्दैवी होता की काही समजायच्या आत होत्याचे नव्हते झाले. व्हिडिओनुसार हे बेरिकेट्स हवेमुळे पडल्याचे दिसत आहे.

हेदेखील वाचा- Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील रायपूर येथे मजूरांची वाहतूक करणाऱ्या बसला अपघात; 7 जणांचा मृत्यू

या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली. हा आघात इतका भयानक होता की या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईत ब-याच ठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याचे बेरिकेट्स लावले आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. आधीच खड्ड्यांनी वाहनांचे अपघात ऐकायला मिळत होते त्यात आताच बेरिकेट्समुळे झालेला हा भीषण अपघात याचे गंभीर परिणाम दर्शवित आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील रायपूर येथे मजूरांची वाहतूक करणाऱ्या बसला मोठा अपघात झाला होता. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले होते. अपघातग्रस्त बस ओडिशामधील गंजम येथून सुरतकडे जात होती. याच दरम्यान, रायपूरच्या चेरी खेडी येथे ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. यात सात जणांचा मृत्यू झाला. तर इतर मजूर जखमी झाले.