COVID-19 (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपया योजना राबवल्या जात आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) घोषीत करण्यात आले होते. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालले आहे. यातच महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आज 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे. तर, राज्यात मुंबई आणि पुणे शहर कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 40 हजार 263 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 1 हजार 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजार 887 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, देशात गेल्या 24 तासात 2 हजार 487 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Lockdown: लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान; बाजारात ग्राहक नसल्याने आंब्यांच्या विक्रीत घट

एएनआयचे ट्वीट- 

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 12 हजार 974 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत.