पुण्यात (Pune) आज 269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून दिवसभरात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5436 वर पोहोचली आहे. आतापर्यंत पुण्यात 264 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉक्टर भगवान पवार (Dr Bhagawan Pawar) यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात पुण्यात 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 2463 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नायडू-पुणे महापालिका 67, खासगी रुग्णालये 24 आणि ससूनमधील 01 रुग्णांचा समावेश आहे. (वाचा - Lockdown: लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 12 हजार 725 तर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 409 गुन्ह्यांची नोंद)
269 new #COVID19 positive cases and 7 deaths have been reported in Pune district today. Total positive cases stand at 5436 in the district and death toll is at 264: Dr Bhagawan Pawar, District Health Officer (DHO) #Maharashtra
— ANI (@ANI) May 23, 2020
आज पुणे शहरात एकाच दिवसात 1 हजार 735 स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण स्वॅब टेस्ट संख्या 40 हजार 493 इतकी झाली आहे. दरम्यान, आज पुण्यात कोरोनासंदर्भातील आढावा बैठक पार पडली. यात टेस्टिंग लॅबच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार, पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ससूनमध्ये नव्याने टेस्टिंग मशीनची खरेदी केली जाणार आहे.
टेस्टिंग मशीनमुळे शहराची टेस्टिंग क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. याबाबतच्या तांत्रिक प्रक्रियाही वेगाने पूर्ण केल्या जाणार असून निधी राज्यसरकार आणि पुणे महापालिका उभारणार आहे. नव्या टेस्टिंग लॅबची मागणी आणि सद्यस्थितीत यावरही या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.