विरार (Virar) येथील एका बिअर शॉपवर दारु पिण्यासाठी आलेल्या एका तरुणासोबत वाद झाल्याने त्याला जबरदस्त मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
केतन असे तरुणाचे नाव असून तो रात्रीच्या वेळेस बिअर शॉपच्या येथे दारु पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे असलेल्या अमित नावाच्या मुलासोबत त्याची शुल्लक कारणावरुन भांडण झाले. मात्र या दोघांमधील भांडण एवढे विकोपाला गेले की अमितने केतनला जबरदस्त मारहाण केल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. या प्रकारानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच केतन याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
(मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन तरुणाने उडी मारत संपवले आयुष्य, शोधकार्य सुरु)
तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र स्थानिकांनी विरार परिसरातील बिअर शॉपवर होणाऱ्या मारामारीमुळे ते बंद करावेत अशी मागणी केली आहे. तर मारहाणीच्या प्रकारामुळे तेथून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.