Bandra Worli Sea Link (Photo Credits-Wikimedia Commons)

मुंबईतील (Mumbai) वांद्रे-वरळी सी लिंकवरुन (Bandra-Worli Sea Link) एका तरुणाने उडी मारत आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाचा शोध घेतला जात असून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे तरुणाने हे पाऊल उचलले असावे याबद्दल अद्याप सांगण्यात येत नाही आहे. तसेच पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात असून शोधकार्य सुरु झाले आहे. तर वांद्रे-वरळी सी लिंकवरुन कोणत्याही व्यक्तीला चालत जाण्यास बंदी आहे. त्याचसोबत सी लिंकवर टोल भरल्यानंतर त्या मार्गाअंतर्गत फक्त दुतर्फा गाड्यांची रांग पाहायला मिळते. मात्र अशा स्थितीत सुद्धा सी लिंकवरुन उडी मारण्याचे प्रकार घडले आहेत.

पार्थ सोमाणी असे तरुणाचे नाव असून तो मुलूंड येथे राहणारा आहे. तसेच पार्थ हा एका CA कडे नोकरी करतो. तर दुपारी 1 वाजताच्या सुमारास पार्थ एका टॅक्सीतून सीलिंकवर आला आणि चालकाला टॅक्सी तेथे थांबवण्यास सांगितले. चालकाने पार्थच्या म्हणण्यानुसार टॅक्सी थांबवली असता त्याने थेट सी लिंकवरुन समुद्रात उडी घेतली. तर या प्रकारानंतर मात्र टॅक्सी चालकाने पळ काढला आहे.  परंतु तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

(पुण्यातील पानशेत धरण प्रलयाला 58 वर्षे पूर्ण; क्षणार्धात नष्ट झाला होता पेशवेकालीन पुण्याचा रुबाब, आजही जखमा आहेत ताज्या)

यापूर्वीसुद्धा एका तरुणाने धावत्या गाडीतून सी लिंकवरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यावेळी तरुण तणावाखाली असल्याने टोकाची भुमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने सध्या घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.