Vande Bharat Mission (PC - PTI)

Vande Bharat Mission: वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 20 फ्लाईट्समधून (Flights) 2594 नागरिक महाराष्ट्र परतले आहेत. यात मुंबईतील 955 प्रवासी, उर्वरित महाराष्ट्रातील 1198 प्रवासी, तर इतर राज्यांमधील 441 प्रवाशांचा समावेश आहे. राज्य शासनामार्फत या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत सोडण्यात आलं आहे. या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. क्वारंटाईनचा काळावधी संपल्यानंतर या सर्वांना आपल्या घरी जाता येणार आहे.

राज्य शासनाने ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका आणि इंडोनेशिया या देशात अडकलेल्यांना भारतीय नागरिकांना माघारी आणले आहे. या व्यतिरिक्त परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या अजून 10 फ्लाईट्स येणे अपेक्षित आहेत. (हेही वाचा - Coronavirus: बीडमध्ये आज 2 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली)

परदेशातून आलेल्या मुंबईतील प्रवाशांना हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार आहे. (हेही वाचा - Coronavirus: धारावीत आज 38 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1621 वर पोहोचली)

दरम्यान, इतर राज्यातील प्रवाशांना वाहतूक पासेस उपलब्ध होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पास मिळताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवलं जाणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने वंदे भारत मिशन राबवण्यात येत आहे.