Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणित वाढत आहे. रुग्णसंख्या, मृतांचा आकडा भीतीदायक वातावरण निर्माण करत असला तरी पुणे (Pune) येथून एक समाधानकारक घटना समोर येत आहे. 25 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह महिलेने निरोगी बाळाला जन्म दिला आहे. 16 एप्रिल रोजी या महिलेला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले होते. आज 20 एप्रिल रोजी तिने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर बाळाची कोरोनाची चाचणी करण्यात आली. मात्र बाळाचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला वेगळ्या वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी माहिती पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर बाळ आणि आई सुखरुप असून बाळाचे वजन 3.5 किलो इतके आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत  पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. पुण्यात आतापर्यंत 611 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 102 रुग्णांची  प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर 51 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

ANI Tweet:

महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट:

यापूर्वी औरंगाबाद, मुंंबई, धुळे येथे कोरोना बाधित महिलांनी निरोगी बाळांला जन्म दिला होता. महाराष्ट्रातील कोरोना  बाधितांची संख्या 4483 पोहचली असून मागील 12 तासांत कोरोनाचे 283 नवे रुग्ण आढळून आले आहेत.