
महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 9 हजार 924 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 83 हजार 723 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 21 हजार 944 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 592 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Jumbo COVID19 Hospitals In Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
एएनआयचे ट्वीट-
227 deaths and 7924 fresh COVID19 cases reported in the state today. The total number of positive cases in the state is now 3,83,723 including 2,21,944 recovered cases and 1,47,592 active cases: Mahrashtra Health Department pic.twitter.com/Kh3Z11Ogml
— ANI (@ANI) July 27, 2020
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातला दर आणखी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यात आज एकूण 8 हजार 706 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 57. 84 टक्क्यावर गेला आहे.ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.