Mumbai Airport वर विना तिकीट प्रवासी पोहचला बोर्डिंग गेट पर्यंत; CISF ने घेतले ताब्यात
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji International Airport, Mumbai) एक 22 वर्षीय व्यक्ती विना तिकीट आत आल्याची घटना समोर आली आहे. त्याच्याकडे तिकीट किंवा त्यासंबंधी अन्य कोणताही दस्ताऐवज नव्हता. aerobridge पर्यंत तो पोहचला असून त्याने इंडिगो च्या विमानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. विमानतळावर कर्मचार्‍याच्या हा गोंधळ लक्षात आल्यानंतर त्याने त्याला CISF जवानाकडे नेले. Sahar Police कडे त्याला नेण्यात आले. Mohammad Isha Alam असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा विना तिकीट विमानतळावर येण्याचा नेमका उद्देश काय होता? हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

प्रथम दर्शनी पाहता तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सहा चेक पॉंईंट्सवरून तो सहज पुढे जाऊ शकला. सध्या त्याची एटीएस कडूनही चौकशी सुरू आहे. आलम हा मूळचा बिहारचा अअहे. मुंबई मध्ये तो नातेवाईकांसोबत खारघर भागात राहत होता. Man Died At Mumbai Airport: व्हीलचेअर न मिळल्याने 80 वर्षीय वृध्दाचा मृत्यू, मुंबई विमानतळावरील घटना ( पाहा ट्वीट) .

TOI च्या वृत्तानुसार हा व्यक्ती शहरात एकटाच फिरत होता. फिरता फिरता तो एअरपोर्ट वर आला. विमानतळावरील सीसीटीव्ही मध्ये तो गेट नंबर 7 वरून 21 फेब्रुवारीच्या रात्री 11.42 च्या सुमारास आल्याचं दिसत आहे. 22 फेब्रुवारीला 1.51 च्या सुमारास तो बोर्डिंग गेट नंबर 70-B वर दिसत आहे.

एअरोब्रीज वर जाऊन त्याने इंडिगो च्या 6E 1511 विमानात चढण्याचा प्रयत्न केला. इंडिगो च्या स्टाफने त्याला रोखले, त्याला तिकीट दाखवण्यास सांगितले तेव्हा तो तिकीट दाखवू शकला नाही. 2.30 च्या सुमारास त्याला CISF कडे देण्यात आले. या घटनेप्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. अशाप्रकारे नागरिक आत येण्याने सुरक्षा व्यवस्था काय करते असा प्रश्न विचारला जात आहे.