बुलढाण्यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेला टी-शर्ट घालून 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Hanging (Photo Credits: Representative Image)

काही दिवसांपूर्वी भाजप पक्षाचे टी शर्ट घालून एका शेतक-याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. तशीच घटना आता बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. मात्र यावेळी एका तरुणाने काँग्रेसचा पक्षाचा टी शर्ट घालून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश गोविंद मोरे असे या तरुणाचे नाव असून तो 21 वर्षांचा आहे. ही घटना आज (17 ऑक्टोबर) ला सकाळी 9 वाजता घडली.

सतीशचे शिक्षण झाले होते, मात्र तो बेरोजगार असल्याने मोलमजूरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत होता, त्याच्या घरी आई-वडील आणि एक भाऊ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा- महाराष्ट्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाररॅली दरम्यान शेतकऱ्याने भाजप पक्षाचे टी-शर्ट घालून गळफास लावत संपवले आयुष्य

घटनेची माहिती मिळाताच धाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह बुलडाणा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच. याप्रकरणी धाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रचाररॅली दरम्यान एका शेतकऱ्याने भाजप (BJP) पक्षाचे टी-शर्ट घालून गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत शेतकऱ्याने भाजप पक्षाच्या घातलेल्या टी-शर्टवर 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहिले होते. ही घटना शेगाव तालुक्यातील खातखेड या गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तलवारे असे 35 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. राजू या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.