Aurangabad Shocker: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात पतसंस्थेत 200 कोटीच्या घोटाळा समोर आला आहे. या पतसंस्थेतील एका ठेवीदाराने आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. या पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याचा भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना औरंगबाद जिल्ह्यातील लाडगाव येथे घडली आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 200 कोटींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले आहे. रामेश्वर नारायण इथर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी सहकारी संस्थेत 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडल्याच्या भीतीने त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आदर्श नागरी सहकारी संस्थेत झालेल्या घोटाळ्यात पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केले. मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान अंबादास मानकापे यांना अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी गोलवाडीत येताच मोठ्या चतुराईने सिडको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा लावत मानकापेंना अटक करण्यात आली आहे.