मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून तरुणीच्या भावाची गळा चिरून हत्या (Murdered) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) येथील वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा या परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे तरुणीचे वडील आणि काका असून ती मृताच्या भावासोबत पळून गेल्याची संशय त्यांना आला. त्यामुळे ते दोघेही आरोपी मृताच्या घरी गेले. दरम्यान, त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातून आरोपींनी तरूणांच्या भावाची गळा चिरून निघृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचा भाऊ आणि आरोपींची बहीण या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची समोर आले आहे. सध्या हे दोघेही तरूण- तरूणी बेपत्ता असल्याचे समजत आहे.
भीमराज गायकवाड असे मृताचे नाव आहे. तर, रोहिदास देवकर आणि देविदार देवकर असे दोन्ही आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या भीमराज गायकवाड याच्या भावाने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याचा संशय तरुणीच्या कुटुंबियांना होता. त्या संशयातून तरुणीच्या काका तरुणाच्या कुटुंबियांवर हल्ला केला. या हल्ल्यात आरोपींनी रागाच्या भरात तरुणाच्या अल्पवयीन भावाची गळा चिरून निघृण हत्या केली. या हल्ल्यात भीमराज याचे आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, रोहिदास याला खंडाळा तर, देविदासला लाख खंडाळा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- नागपूर: लग्नाची मागणी केली म्हणून प्रियकराकडून प्रेयसीचा खून; आरोपी अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचा भाऊ अमोल गायकवाड तर, शेजारील देवकर वस्तीत राहणारी आरोपींची बहिण गेल्या 12 मार्चपासून बेपत्ता असल्याचे समजत आहे. त्यामुळे अमोल यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबियांना आहे. या रागातूनच तरुणीचे वडील आणि काकांनी बेपत्ता मृताच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.