Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus: पुण्यात (Pune) आज 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे. आज पुण्यात एका 40 वर्षीय पुरुषाचा आणि 50 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

पुणे शहरात रविवारी दिवसभरात 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 243 इतकी झाली आहे. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण 284 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत एका दिवसात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 150 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 1 हजार 549 पोहचली आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)

महाराष्ट्र राज्यात आज 82 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2064 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबई शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 59 आहे. तसेच भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 324 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 8048 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 980 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.