मुंबई: लोअरपरळ येथे मद्यधुंद डंपरचालकाने तिघांना चिरडले; दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईतील (Mumbai) लोअरपरळ (Lower Parel ) येथील बावला मशिदीसमोर (Bawla Masjid) सोमवारी (24 फेब्रुवारी) रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिघांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जखमीवर  नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय पवार (59) असे एका मृत व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. (सोलापूर: एसटी आणि जीप ची धडक; अपघातात 4 जण ठार, 10 जखमी)

भरधाव वेगात असलेला डंपरचालक दारुच्या नशेत होता. त्यामुळे त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या डंपरने दिलेल्या धडकेने टॅक्सीचे नुकसान झाले तर एका कारचा चक्काचूर झाला आहे. (पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; 60 गाड्या अंगावरुन गेल्याने छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह)

अपघातानंतर डंपरचालक तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने वाहतुककोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवून वाहतूकीचा मार्ग मोकळा केला. तसंच या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Drink and Drive हा गुन्हा असून मद्य सेवनानंतर गाडी चालवू नये असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. तरी देखील मात्र अशा प्रकारच्या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात.