वर्धा: क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या 2 क्रिकेटपटूंचा रस्ते अपघातात मृत्यू
Accident | File Image

क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या 2 क्रिकेटपटूंचा (Cricketers) रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर (Nagpur-Tuljapur State Highway) शनिवारी हा अपघात झाला. जयेश प्रवीण लोहिया (वय -10), अक्षद अभिषेक वैद (वय-11) असे मृतांचे नावे आहेत. जयेश आणि अक्षद हे वर्ध्यातील 'ब्रदर हूड क्रिकेट क्लब'चे क्रिकेटपटू होते. यातील मृत जयेश हा 'मॅन ऑफ द मॅच' (Man of the Match) ठरला होता.

यवतमाळ शहरातील गोधणी मार्गावर पद्मविलास क्रिकेट क्लबने टी-20 सामन्यांचे आयोजन केले होते. दरम्यान, शनिवारचा सामना झाल्यानंतर वर्धेतील क्रिकेट क्लबचे क्रिकेटपटू कारने (एमएच-32, एएच 3777) पालकांसोबत वर्ध्याकडे निघाले होते. त्यावेळी नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर चापडोह पुनर्वसनजवळ त्यांची कार डिव्हाडरवर आदळली. या अपघातात कारमधील 2 क्रिकेटपटूंचा जागेवर मृत्यू झाला. तसेच कारमधील क्रिकेटपटूंसह त्यांचे पालक गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल)

या अपघातात मृत झालेला जयेश हा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता. जयेशने 6 बळी घेऊन संघाला विजय मिळवून दिला होता. या अपघातात 2 चांगल्या क्रिकटपटूंचा मृत्यू झाल्याने वर्धा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.