Mumbai Marathon: मुंबई मॅरेथॉन दरम्यान 2 स्पर्धकांचा मृत्यू, 22 जण रुग्णालयात दाखल
Mumbai Marathon (फोटो सौजन्य - X/@bombaymalayali)

Mumbai Marathon: रविवारी मुंबई मॅरेथॉन (Mumbai Marathon) 2024 दरम्यान मरीन ड्राइव्हवर (Marine Drive) दोन सहभाग्यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 22 जणांना डिहायड्रेशन आणि इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 75 वर्षीय सहभागी राजेंद्र चंदमल बोरा यांना संपूर्ण 42 किलोमीटर मॅरेथॉन धावताना हृदयविकाराचा झटका आला. बोरा मरीन ड्राईव्हवर अचानक कोसळले. त्यामुळे जवळच्या लोकांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तसेच आणखी एक सहभागी सुवर्णदीप बॅनर्जी (46) यांचाही मॅरेथॉनदरम्यान बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाला. बॅनर्जी वरळी येथून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. ते अचानक खाली पडले. पोलिसांनी त्याला नायर रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. बॅनर्जी यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. (हेही वाचा - मीरा रोड मध्ये श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्यांची तोडफोडीनंतर स्थिती बनली तणावग्रस्त; गुन्हा दाखल

एशियन हार्ट इन्स्टिट्यूट (AHI) च्या डॉक्टरांनी सांगितले की, 1,820 धावपटूंपैकी 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 19 जणांना संध्याकाळपर्यंत सोडण्यात आले. यातील बहुतेक जणांना स्नायू पेटके, हायपोग्लाइसेमिया, जखम, थकवा आणि निर्जलीकरण असा त्रास होता. (हेही वाचा - Accident on Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पहिला अपघात, संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ

मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे. दरम्यान, रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियन धावपटूंनी वर्चस्व राखले.