पुण्यात गेल्या 24 तासांत 193 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 10 जणांचा मृत्यू; जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4370 वर पोहोचली
Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

पुण्यात (Pune) गेल्या 24 तासांत 193 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 221 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4370 वर पोहोचली आहे. यासंदर्भात पुण्याच्या आरोग्य विभागाने (Pune Health Department) माहिती दिली आहे.

गेल्या 24 तासांत पुण्यात 1 हजार 459 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 33 हजार 795 स्वॅब टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करून घरी जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. आज दिवसभरात शहरातील 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यात नायडू-पुणे महापालिका 96, ससून 13 आणि खासगी रुग्णालयामधील 01 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुण्यात 1 हजार 910 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (हेही वाचा - कोरोना रुग्णांमध्ये दिसला मुंबईचा स्पिरिट, 'यम्मा-यम्मा' गाणं म्हणत कोव्हिड रुग्णांनी घेतला अंताक्षरीचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे 2100 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 37 हजार 158 वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात सर्वाधिक 1,202 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.