Dussehra 2021: दसऱ्याच्या आधीच मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1,805 चे गुन्हे दाखल, 134 ठिकाणी उभारली नाकाबंदी
Traffic | Representative Image (Photo Credits: Pixabay)

दसऱ्याच्या (Dussehra) अगोदर त्याच्या ऑल आउट ऑपरेशनचा (All out operation) भाग म्हणून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी तीन तासांसाठी संपूर्ण मुंबईत 134 ठिकाणी नाकाबंदी (Blockade) केली होती. तसेच अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले ज्यात 7,792 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल 1,805 जणांवर वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यात पाच जण मद्यधुंद ड्रायव्हिंगसाठी होते. पोलिसांनी समाजविघातक घटकांच्या नोंदीही तपासल्या आणि 50 वॉन्टेड किंवा फरार आरोपींना अटक केली आहे. 82 आरोपी ज्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले गेले आणि 38 गुन्हेगार जे बाहेर असतानाही शहरात फिरत आढळले. प्रतिबंधात्मक पावलांचा एक भाग म्हणून, दहशतवादविरोधी कक्षाने देवीच्या मूर्तींसाठी 51 विसर्जन स्थळे तपासली.

याशिवाय पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईतील 428 संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. एकूण 888 हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊसेस आणि हॉस्टेलवर नजर ठेवण्यात आली होती. जेणेकरून गुन्हेगार आणि समाजकंटक तिथे राहणार नाहीत. याशिवाय अवैध दारू आणि जुगाराशी संबंधित 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शुक्रवारी सण संपत असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी असामाजिक घटकांकडून तलवारी आणि चाकू सारखी 45 हत्यारे जप्त केली आहेत. हेही वाचा Mumbai Local Update: 18 वर्षांखालील सर्व विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा

शहरातील दसरा उत्सव आणि दुर्गा मूर्ती विसर्जन पाहता, मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवार आणि शनिवारसाठी रस्ते निर्बंधांबाबत अपडेट जारी केले आहेत. शहर वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 17 रस्ते बंद केले जातील, 18 रस्ते एकेरी केले जातील, तर काही रस्त्यांवर पार्किंग प्रतिबंध लावले जातील आणि सात रस्त्यांवर अवजड वाहनांवर बंदी असेल. शुक्रवार आणि शनिवारी दुपारी 3 ते मध्यरात्रीपर्यंत निर्बंध लागू राहतील.