Air India Flight Collides With Tug Truck: एअर इंडियातील 180 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. गुरुवारी म्हणजेच काल 16 मे रोजी पुणे विमानतळावर धावपट्टीकडे जात असताना दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान (Air India Flight) टग ट्रॅक्टरला धडकले. विमानात सुमारे 180 प्रवासी असताना ही घटना घडली. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, सुमारे 180 प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानाचे लँडिंग गियरजवळील टायरचे नुकसान झाले आहे. आपत्कालीन प्रोटोकॉल त्वरीत अंमलात आणले गेले. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
विमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली. तसेच प्रवाशांना तात्काळ उतरवण्यात आले आणि दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. DGCA ने तपास ऑपरेशनल प्रोटोकॉल आणि घटना घडवून आणलेल्या संभाव्य त्रुटींचा तपास करत आहे. (हेही वाचा -Air India Express: क्रुच्या कमतरतेमुळे एअर इंडिया एक्सप्रेसचे 85 उड्डाणे रद्द)
या दुर्घटनेनंतर विमानतळाचे कामकाज कोणत्याही महत्त्वपूर्ण व्यत्ययाशिवाय सुरू राहिले. तथापि, प्रभावित विमानाची तपशीलवार तपासणी आणि दुरुस्तीसाठी थोड्या काळासाठी सेवेतून बाहेर काढण्यात आले. आता ते ऑपरेशनसाठी सज्ज आहे. दरम्यान, बुधवारीच दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात ठेवलेल्या टिश्यू पेपरवर 'बॉम्ब' लिहिलेले आढळून आले, त्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी संपूर्ण विमानाची तपासणी केली. मात्र काहीही संशयास्पद आढळलं नाही. नंतर ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. (हेही वाचा - Air India Express ची 70 पेक्षा जास्त इंटरनॅशनल, डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द; वरिष्ठ क्रु Mass Sick Leave वर)
एअरलाइनचे अनेक कर्मचारी एकत्र रजेवर गेले होते, त्यानंतर शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, कंपनीने प्रवाशांना परतावा किंवा अन्य विमान सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर एकत्रित सुट्या घेणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर कंपनीकडून कारवाई करण्यात आली.