Mumbai Cyber Crime: अंधेरीमधील व्यापाराला 18.51लाखांचा ऑनलाइन गंडा, एकास अटक
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अंधेरीमध्ये (Andheri) एका खाजगी कंपनीचा मालकाने (Businessman) सायबर फसवणूकीत (Cyber Fraud) 18.51 लाख रुपये गमावले. ज्यात काही फसवणूक करणाऱ्यांनी त्याचे सिम कार्ड (SIM Card) ब्लॉक केले आणि त्याच्या नकळत त्याच्या बँकेतून रक्कम काढली. 17 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालमधून एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून काही लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे. तक्रारदाराने या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) सायबर पोलिसांकडे एफआयआर दाखल केला होता. त्याच्या तक्रारीनुसार, त्याचे सहकारी बँकेत खाते आहे. ज्यात त्याला 60 लाख रुपयांची ओव्हरड्राफ्ट सेवा दिली होती.

18 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या सुमारास त्यांचे सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले. त्याने दूरसंचार ऑपरेटरच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केला ज्याने त्याला दुसऱ्या दिवशी गॅलरीला भेट देण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी, तक्रारदाराने गॅलरीला भेट दिली. तेव्हा त्याचे सिमकार्ड सक्रिय झाले होते. परंतु त्याच रात्री ते पुन्हा ब्लॉक केले गेले. हेही वाचा  Maharashtra Winter Session 2021: नितेश राणे यांचे ‘म्याऊ… म्याऊ’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपची घोषणाबाजी

दुसर्‍या दिवशी तो पुन्हा गॅलरीत गेला आणि त्यांना माहिती मिळाली की त्यांना एका मोबाइल नंबरवरून विनंती आली आहे. जिथे कोणीतरी त्याची तोतयागिरी केली आहे. त्याचे केवायसी तपशील वापरून सिम कार्ड ब्लॉक केले आहे. 21 ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने त्यांची दोन बँक खाती तपासली असता त्यांच्या दोन खात्यांमधून 18.51 लाख रुपये चार वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले.

काही रक्कम अटक आरोपी नुरोतम बिस्वास याच्या खात्यात गेली. या टोळीने तक्रारदाराचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. ज्यामुळे त्याला त्याच्या बँकेकडून व्यवहारांचे अलर्ट मिळाले नाहीत. त्यांनी हे देखील सुनिश्चित केले की त्याला त्याच्या ईमेल आयडीवर त्याच्या बँकेकडून अलर्ट मिळाले नाहीत, असे डीसीपी, सायबर, रश्मी करंदीकर यांनी सांगितले.