नवी मुंबईत भाजपला धक्का बसणार असून राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून 20 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. 

कोलकाता येथे देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा लवकरत सुरु होणार  आहे. 

 मुंबईच्या काही भागात म्हणजेच कुर्ला, मानखुर्दसह यासह अन्य ठिकाणी आज रात्री 12 वाजल्यापासून 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

भामरागड येथे गडचिरोली पोलीस दलातील कमांडो पथकाने बेधडक कारवाई करून एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातल्याचे समजत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील अबुजमाड जंगलात ही कारवाई झाली असून. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी कमांडो पथकावर गोळीबार करताच कमांडोंनी केलेल्या कारवाईत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे. सोबतच ३०० अन्य नक्षलवादी पळून गेल्याची माहिती देखील समोर येत आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या माहितीनुसार, येत्या 24 फेब्रुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे थेट वॉशिंग्टन वरून अहमदाबाद ला येतील मोटेरा स्टेडियम मध्ये ट्राम यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाला तब्बल 1 लाख लोक उपस्थित राहणार आहेत.

जीएसटी भवनाला आज लागलेल्या आगी वरून भाजप नेते प्रवीण छेडा यांनी संशय घेत, या आगीत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल केला आहे, या भवनात महसूल संबंधित महत्वाची कागदपत्रे असतात, घोटाळे लपवण्यासाठी ही आग मुद्दाम तर लावलेली नाही ना असेही छेडा यांनी म्हंटले आहे. 

शिवाजीचे उद्दातीकरण; पडद्यामागेचे वास्तव या पुस्तकावरून आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे, या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह्य विधाने केल्याचे म्हणत भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.  

पाकिस्तान मधील क्वेटा येथे झालेल्या ब्लास्ट मध्ये ५ जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याचे समजत आहे.

 'सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' हे वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे हा इंदुरीकर महाराजांना नाहक त्रास देऊन नका अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला आहे.  

Load More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (17 फेब्रुवारी) आणि उद्या दोन दिवसांच्या कोकण दौर्‍यावर आहेत. दरम्यान या कोकण दौर्‍यामध्ये उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. दरम्यान नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देत प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली होती. मात्र आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12च्या सुमारास उद्धव ठाकरे गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या 102 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळालेल्या प्रमुख विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत. दरम्यान त्यानंतर आज दक्षिणेतील काशी समजली जाणार्‍या आंगणेवाडी जत्रेला नेते आणि पदाधिकार्‍यांसोबत जाऊन भराडी देवीचं दर्शन घेणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मात्र टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पर्यटन दौरा असल्याचं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे. या दौर्‍यादरम्यान कोकणवासीयांना काहीच मिळणार नसल्याचं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत. अद्याप अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तुमचं सरकार तुम्ही चालवा; कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या असेही त्यांनी म्हटलं आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद समोर येत आहेत. आज एनसीपी अध्याक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा अर्धवट सोडून 16 मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज एकीकडे उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या बैठकीकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.