Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

Coronavirus Cases In Pune: पुणे शहरात आज 1508 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे शहरात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 37 हजार 386 इतकी झाली आहे. आज पुण्यात एकाच दिवसात 3 हजार 815 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 3, 815 कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या आता 2 लाख 02 हजार 304 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 13 हजार 799 रुग्णांपैकी 557 रुग्ण गंभीर असून यातील 94 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 463 रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. (हेही वाचा - 'मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायाकडे साकडे का घातले?' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या राम मंदिरावरील टीकेला विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर)

पुणे शहरातील 730 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 22 हजार 611 झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे आभार मानले आहेत.

दरम्यान, राज्यात मुंबई, ठाणे, पालघर, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात तब्बल 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.