Dharavi Coronavirus Update: धारावीत आज 15 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, सध्या 94 रुग्णांवर उपचार सुरू
Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Dharavi Coronavirus Update: धारावीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे. आज धारावीत 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,775 इतकी झाली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत धारावीतील 2,416 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या धारावीतील 94 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

एकेकाळी धारावी झोपडपट्टी परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला होता. परंतु, आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजनांमुळे धारावीतील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. (हेही वाचा - आरोग्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा; सोशल मीडिया पोस्टवरून सांगितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक)

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याची जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील यापूर्वी दखल घेतली आहे. धारावीत राबवण्यात आलेले धारावी मॉडेल देशातील अनेक शहरात राबवण्यात आले. दरम्यान, रविवारी मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 1,237 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,44,626 इतकी झाली आहे.