Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) आज 3827 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 124331 अशी झाली आहे. आज नवीन 1935 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 55651 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये आढळून येत आहे. आज मुंबईत 114 जणांचा मृत्यू झाला असून 1269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 64,068 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. याशिवाय आज मुंबईतील धारावीत 17 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2151 वर पोहोचला आहे. (हेही वाचा - धारावीत आज 17 नवे कोरोना रुग्ण; एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2151 वर पोहोचला)
142 deaths and highest single-day rise of 3827 new COVID19 cases reported in Maharashtra today; the total number of positive cases in the state is now 1,24,331: State Health Department pic.twitter.com/rt20M1VXAB
— ANI (@ANI) June 19, 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. लॉकडाऊन 5.0 मध्ये सरकारने अनेक अटींमध्ये शिथिलता दिली आहे. परंतु, गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.