Coronavirus (Photo Credits: IANS)

मुंबईतील धारावीत (Dharavi) आज 17 जणांना कोविड-19 ची (COVID19) लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2151 वर पोहोचला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहरात आढळून येत आहे. गुरुवारी धारावीत 28 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली. मुंबई शहरातील धारावी हा आतापर्यंत कोरोनाचा हॉटस्पॉट होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई उपनगरातील अंधेरी, दादर, वरळी, दहिसर ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. (हेही वाचा - सिंधुदुर्ग येथील आरटीपीसीआर आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन)

दरम्यान, गुरुवारी मुंबईत 1298 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 62,799 वर पोहोचली आहे. तसेच काल मुंबईतील 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबई शहरात मृतांचा एकूण आकडा 3,309 इतका झाला आहे. तसेआतापर्यंत एकूण 31,856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

याशिवाय भारतात कोरोना रुग्णांचा आकडा साडेतीन लाखांच्या वर पोहचला आहे. गुरुवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात 13,586 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 336 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 3,80,532 इतका झाला आहे.