नालासोपारा: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्या कारणाने 14 वर्षीय मुलीला आरोपीने केली बेदम मारहाण; पीडित मुलगी गंभीर जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अल्पवयीन मुलींवर, महिलांवर अत्याचाराच्या, बलात्काराच्या दिवसेंदिवस गंभीर रुप घेताना दिसत आहे. महिलांवर शारीरिक अत्याचार करणा-या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी अजूनही म्हणावा कडक कायदा बनला नाही. त्यामुळे असे नराधम समाजात जास्त माजलेत. नालासोपा-यात (Nalasopara) अशीच एक धक्कादायक घटना आहे. ज्यात एका तरुणाने तिच्याच सोसायटीत राहणा-या 14 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मटाने दिलेल्या बातमीनुसार, तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने नकार दिल्या कारणाने या तरुणाने तिचे डोके भिंतीवर आदळले. यात ती मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडित मुलगी आणि आरोपी तरूण हे दोघेही एकाच इमारतीत राहतात. ओळखीचा गैरफायदा त्याने तिला इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. तिथे त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्याकडे शारीरिक संबधांची मागणी केली. मात्र तिने त्याला ताबडतोब नकार दिला. यावेळी राग अनावर झाल्याकारणाने त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अशावेळी तिने त्याला प्रतिकार करायला सुरुवात केली. तिचा विरोध पाहून त्या माथेफिरूने तिचे केस धरुन तिला समोरील भिंतीवर आदळले. यात ती गंभीररित्या जखमी झाली आणि जागेवर कोसळली. इतकेच नव्हे आरोपीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन तिथून पळ काढला.

हेदेखील वाचा- लज्जास्पद! सास-याने सुनेवर केला वारंवार बलात्कार तर सासूने कापली तिच्या हाताची नस

डोकं भिंतीवर आपटल्या कारणाने त्या मुलीच्या डोक्याला जबर मार बसला तसेच त्याला प्रतिकार करत असताना तिच्या हाताला जखमा देखील झाल्या. घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

तिने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. सदर घटनेतील आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.