लज्जास्पद! सास-याने सुनेवर केला वारंवार बलात्कार तर सासूने कापली तिच्या हाताची नस
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक मध्ये घडली आहे. सास-याने सुनेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेची सुनेने कुठेही वाच्यता करु नये म्हणून सासूने तिच्या हाताची नस कापल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2019 ते मार्च 2019 दरम्यान संशयिताने आपल्या सुनेवर 3 वेळा बलात्कार केला. अशोक जाधव असे या संशयिताचे नाव असून त्याचे वय 51 वर्ष आहे. 18 मार्च 2019 रोजी सास-याने पीडितेला इनोव्हा कारमधून एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच या गोष्टीची कुठे वाच्यता केली तर मुलासोबत नांदू देणार नाही अशी धमकीही दिली. मात्र तरीही पीडितेने सासू आणि पतीच्या कानावर ही गोष्ट घातली. मात्र सासूने तिची मदत करायची सोडून हे प्रकरण बाहेर पडू नये म्हणून सुनेचा छळ करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर एकदा त्यांनी सुनेच्या हाताची नस कापली. लज्जास्पद! सास-याने सुनेवर केला वारंवार बलात्कार तर सासूने कापली तिच्या हाताची नस

अखेर त्रास सहन न झाल्यामुळे पीडितेने हिंमत करुन गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना गुन्हा दाखल करून तिचे सासरे अशोक जाधव यांना अटक केली.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पीडितेची सासू आणि पती आकाश हरिश्चंद्र जाधव यांची चौकशी करत आहेत.