Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus: पुण्यात (Pune) आज दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली आहे. आज पुण्यात नोंद करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नायडू-महापालिका रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 23 आणि ससून रुग्णालयात 5 जणांचा समावेश आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, पुणे शहरात आज 1 हजार 543 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत पुण्यात एकूण संख्या 21 हजार 813 कोरोना चाचणी झाल्या आहेत. यात आतापर्यंत 2 हजार 380 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. याशिवाय पुण्यात आतापर्यंत 826 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 1 हजार 414 रुग्णांवर उपचार सुरु असून 140 कोरोना रुग्ण दगावले आहेत. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी पार केला 20 हजारांचा टप्पा; राज्यात आज 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर तर 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू)

आज दिवसभरात 96 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 826 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात नायडू-महापालिका रुग्णालयातील 74, खाजगी रुग्णालय 12 आणि ससूनमधील 10 रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सध्या 826 झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.